
सहसंपादक: रामभाऊ भोयर
पोलीस स्टेशन कळंब येथे आज दिनांक २०/१२/२०२३ रोजी,पारधी बेडा तिरझडा पो. धोत्रा ता. कळंब जि. यवतमाळ येथे पंडीत येनसारी घोसले हे त्यांचे कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुले व दोन मुली असुन सर्वांचे लग्न झाले आहे. त्यांची लहान मुलगी सौ. रेखा हिचे लग्न गोविंदा बिरचंद्र पवार रा. कळंब माथा याचे सोबत झाले असुन त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. जावई गोविंदा पवार हा सौ. रेखाचे चारित्रावर संशय घेवुन नेहमी तिचे सोबत वाद करीत होता त्याबाबत दोन्ही साळे व सासु सास-याने समजावुन सांगीतले होते. परंतु तो काहीही ऐकत नव्हता तो त्याचे पत्नीला चारित्रावर संशय घेवुन त्रास देत असल्याने त्याचे सास-याने व साळयानी सुध्दा यापुर्वी त्याला मारहाण केली होती. दिनांक १९/१२/२०२३ रोजी रात्री १०.०० वा चे सुमारास रेखा पवार व गोविंदा पवार हे दोघे त्याचे मोटार सायकलने शेतात सुनिल घोसले याचे करीता डब्बा घेवुन घरून पंडीत यांचे शेतामध्ये गेले होते. त्यानंतर काही वेळात रात्री अंदाजे १०.३० वा चे सुमारास पंडीत घोसले याचे घराचे टिन वाजल्याच्या आवाज आल्याने पारथी बेडयातील विनोद नाशिक चव्हाण, अर्जुन रमेश घोसले, गोदाबाई शहाबुद्दीन घोसले घराबाहेर आलो तेव्हा जावई गोविंदा पवार हा हातामध्ये लोखंडी सब्बल घेवुन सोबत त्याचे तिन्ही मुलांना मोटार सायकलवर बसुन घाई घाईत निघुन गेला त्यावेळी त्याचे मुले रडत होती. म्हणुन पंडीत घोसले यांचे घरात जावुन पाहीले असता त्याचे घरी समोरच्या पलंगावर मोठा मुलगा ज्ञानेश्वर उर्फ नाना हा डोक्याला मार लागुन रक्तबंबाळ होवुन मरण पावलेला दिसला. तेव्हा ओरडण्याचा आवाज आल्याने आम्ही ज्ञानेश्वर उर्फ नाना राहत असलेल्या बाजुलाच असलेल्या घरात जावुन पाहीले असता पंडीत याचे डोक्याला मार लागुन रक्त बंबाळ होवुन तो मरण पावलेला दिसला. बाजुलाच पंलगावर रुख्मा पंडीत घोसले ही रक्त बंबाळ होवुन तडफडत होती. तिला डोक्याखाली मानेला घाव लागलेला दिसत होता. तेव्ही मी गावातील राजु शेंडे याचा अॅटो बोलावुन श शहाबुद्दीन घोसले यांचे सह उपचाराकरीता सरकारी दवाखाना कळंब येथे नेले. त्यावेळी मला जावई गोविंदा पवार हा रेखा हिला शेतामध्ये डब्बा घेवुन मोटार सायकलने गेला होता परंतु रेखा ही परत न आल्याने तिचे बरेवाईट केले नसावे याचा संशय आल्याने पोलीस पाटील विनोद आगलावे व गावातील इतर लोक शेतात गेलो असता तेव्हा तेथे आम्हाला रेखा व चुलत भाऊ सुनिल पंडीत घोसले हे दोघे डोक्याला मार लागुन रक्त बंबाळ होवुन मरण पावलेले दिसले. जावई गोविंदा पवार याने त्याची पत्नी रेखा पवार हिचे चारित्राचे संशयावरून मनात राग धरून सबलीने पंडीत घोसले, ज्ञानेश्वर उर्फ नाना घोसले, सुनिल घोसले, रेखा पवार यांचा खुन केला तसेच . रूख्मा घोसले हिला जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो. स्टे. कळंब येथे अप क्रंमाक ६६४/२०२३ कलम ३०२, ३०७ भांदवी चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
नमुद गंभीर घटनेचे गांर्भीय ओळखुन तात्काळ पोलीस स्टाफ घटनास्थळ व आरोपी शोध कामी रवाना झाले व सदर गुन्हयातील आरोपी गोविंदा बिश्चंद्र पवार वय ४० वर्ष रा. कळंब माथा हा गुन्हा केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असतांना त्याला पोलीसांनी अटक केली. व चारही मयतांचे प्रेताचा पंचनामा करून तात्काळ प्रेत पी एम करीता ग्रामीण रूग्णालय कळंब येथे रवाना केले.
सदरची कार्यवाही . पोलीस अधीक्षक . पवन बनसोड, . संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात पो. नि. दिपमाला भेंडे ठाणेदार पो. स्टे. कळंब, पोउपनि आशीष शिंदे, पोउपनि सागर भारस्कर, पोउपनि सुरेश झोटींग, पोहवा/७५५ ओमप्रकाश धारणे, पोहवा ९१८ राजु कुडमेथे, पोहवा ३५६ राजु इरपाते, पोहवा / ४५१ गजानन धात्रक, पोहवा/८६२ गजानन कोरडे, पोना/१७०५ नितीन कडुकार, पोकों ५८२ मंगेश ढबाले यांनी केली.
