
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राहुल मेश्राम यांच्या पुढाकारातून राळेगाव तालुक्यात पहील्यांदाच महिलांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिराची सुरुवात ही राजमाता जिजाऊ, आणि सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्याअर्पण करून करण्यात आले. त्यानंतर सदर शिबिराचे उद्घाटन हे वडकी येथील स्मॉल वंडर ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्य डॉ. मंजुषा सागर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आठमुरडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. मारोती मेश्राम काका, व डॉ. हर्षल येरकाडे साहेब उपस्थित होते. सदर शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर नेत्ररोग तपासणी शिबिराला सुरुवात झाली. या मध्ये अंगणवाडी सेविका , मदतनीस, आशा सेविका, महिला पोलिस पाटील व परिसरातील इतर गावातील महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. ही तपासणी डॉ.हर्षल येरकाडे. MBBS, MS (नेत्ररोग तज्ञ) यांनी केली. या शिबिरामध्ये काही रुग्णांना मोतीबिंदू हा आजार आढळला आहे. अश्या रुग्णांना एक दिवस ठरवून , नेत्ररोग तज्ञ यांच्या कडून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. परिसरातील
अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या पुढील काळात पूर्ण राळेगाव तालुक्यामध्ये, राहुल मेश्राम यांच्या पुढाकारातून व त्यांच्या डॉक्टर मित्र मंडळीच्या सहकार्यातून तालुक्यातील प्रत्येक गावांन मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहे. शैक्षणिक, व आरोग्य विषयक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 31 मार्च रोजी भव्य मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते. या
मोफत नेत्ररोग तपासणी
शिबिराच्या यशस्वी आयोजना करीता, या शिबिराचे मुख्य आयोजक राहुल मेश्राम यांच्या सह
विक्की माने, सुधीर माहूरे, आकाश फरकाडे, निलेश येपारी, अरविंद कोडापे, यश मेश्राम, हर्षल कडू, साहिल मेश्राम, अमोल वाघमारे, रजत चांदेकर, बळीराम मेश्राम इत्यादीचे सहकार्य लाभले व शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
