ह.भ.प. नामदेव वाढंई महाराज यांचा रिधोरा येथे जाहीर सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

  

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ह. भ. प. नामदेव वाढंई महाराज यांचा रिधोरा येथे सत्कार करण्यात आला १९ फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने रिधोरा येथील रहिवासी असलेले ह. भ. प. नामदेव महाराज यांचा या निमित्ताने रिधोरा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला हा सत्कार करण्या मागचे उद्दिष्ट एवढेच की रिधोरा गावाला जिजाऊ चा पुत्र शिवबा जरी मिळाला नाही तरी जिजाबाई चा पुत्र ह. भ. प. नामदेव महाराज यांच्या नावाने मिळाले असल्याने या गावांमध्ये अनेक उपक्रम राबवले व अनेक मुलांचे भविष्य घडवून रिधोरा गावाचे नाव जिल्ह्यातच नाही तर अख्या महाराष्ट्रात गाजवले. आज 15 ते 20 वर्षापासून रिधोरा येथे गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करून सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून अनेक मुलांना घडवले आज पहिल्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंत च्या मुलांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, परमपिता महात्मा गांधी, श्री छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या जीवन चरित्रावर बोलायचे म्हटलं की अवघ्या दोन मिनिटात उभे होऊन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे काम करतात ही देन नामदेव महाराज यांनी रिधोरा येथील मुलांना दिली इतक्यावरच नाही तर रिधोरा येथे आजही पहिल्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंतच्या मुलांमध्ये एकही कला नसेल असे कोणीही म्हणणार नाही आज रिधोरा येथील पहिल्या वर्गापासून तर दहाव्या वर्गांच्या मुला, मुलींना गायन, पेटीवादक, तबलावादक, ढोलक वादक, हार्मोनियम वादक, खंजेरी वादक, असे म्हणून ओळखले जातात रिधोरा गावामध्ये आजही पहिल्या वर्गाच्या मुलांना स्टेजवर जाऊन महापुरुषाबद्दल चार शब्द बोलायचे म्हटले की पटकन उठून तो आपले मनोगत व्यक्त करतो ही देन फक्त नामदेव महाराज यांनी रिधोरा गावाला दिली आहे. नामदेव महाराज हे मूळचे रिधोरा गावचे रहिवासी असून ते आज बाबुळगाव पंचायत समितीमध्ये एका वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी करत आहे. परंतु ते वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी हप्त्यातून दोन दिवस देत व सर्व गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो त्यांचाच वसा घेत अजूनही गावातील मुले त्यांच्याच नावावर कार्य करत आहे आजही ग्रामगीतेबाबत आणि ग्रामगीतेमध्ये कोणत्या ओळी त कोणता अध्याय आहे ते आज रिधोरा येथील मुले पटकन उठून सांगू शकतो तर ही देन रिधोरा गावासाठी कौतुकास्पद आहे.तर ही देन फक्त नामदेव महाराज यांचीच आहे नामदेव महाराज यांच्या आईचे नाव जिजाबाई आहे. सदर शिवाजी महाराजांची जी मन आहे अंधार झाला फार आता दिवा पाहिजे या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे अशी जी मन आहे ती मन खरी आहे. हे रिधोरा ग्रामवास्यांनी अजमावले आहे. नामदेव महाराज यांच्या आईचे नाव जिजाबाई आहे आणि जिजाबाई चा पुत्र नामदेव महाराज आहे. यांनी रिधोरा येथील सर्व मुलांना घडवले आहे म्हणून रिधोरा गावाला जिजाउचा पुत्र शिवबा जरी मिळाला नाही तरीपण शिवबाच्या नावाने जिजाबाई चा पुत्र नामदेव महाराज मिळाल्याने बऱ्याच मुलांचे भविष्य घडले असल्याने रिधोरा ग्रामवासी यांच्याकडून ह भ प नामदेव महाराज यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला आहे.