

प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
सर्वसामान्यांना परवडेल अशा विविध दुर्धर आजारावर उपचार होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल यात काही शंका नाही हेच ध्यानात घेऊन राज्याने व केंद्र शासनाने आरोग्य योजनेच्या विविध योजनेला बळकटी देण्याचे काम केले सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीचे शरीर हेच संपत्ती असते तसेच ज्या व्यक्तीची परिस्थिती जेमतेम असेल व एखाद्या दुर्धर आजाराने ग्रासले असल्यास अशा योजनांमुळे नक्कीच त्या कुटुंबाला खूप मोठा आधारवडाच्या स्वरूपात मदत होईल म्हणून यात शहरातील ६००० लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
याला अनुसरूनच ढाणकी शहरात सुद्धा दिनांक २६ एप्रिल बुधवार रोजी शहरातील हनुमान मंदिरात या शिबिराचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी योजनेत सहभाग घेऊन केवायसी व इतर त्रुटी जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकूण शहरांमध्ये ७ ठिकाणी हे शिबिर लागणार आहे त्यात १) श्री बसवेश्वर मंदिर, 2) श्री हनुमान मंदिर ३) नोनीहाल कॉन्व्हेंट,४) आठवडी बाजार, 5) टेंभेश्वर नगर, ६) आर्यवैश्य भुवन,७) व शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी २५ते २९ एप्रिल ला शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड पाच लाखापर्यंत मोफत उपचार लाभा संदर्भात मार्गदर्शन व ई केवायसी सुद्धा करण्या संदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे मागील दोन दिवसात झालेल्या शिबिरात १७० नागरिकांनी या शिबिराला भेट दिली पण शिबिर चालू असताना केवळ काही मोजक्या लोकांनी याचा लाभ घेतल्यामुळे आरोग्य विभाग अंतर्गत नागरिकांना आव्हान करण्यात आले की जागरूक राहून या योजनेत स्वतःची जबाबदारी ओळखून शिबिरात जास्तीत जास्त लाभ, लाभार्थ्यांनी घेण्याचे आव्हान यावेळी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले केवायसी करण्याकरिता आधार कार्ड, राशन कार्ड, पीएम किसान पत्र, मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील २१ रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ होणार आहे व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असून यात महाराष्ट्र राज्य राबवत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. व विविध १२०९आजारावर पाच लाख रुपयापर्यंत उपचार मिळत असल्यामुळे सर्वसामान्यां चे जीवनमान उंचावेल. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ धम्मपाल मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनात डॉ स्वाती मुनेश्वर,डॉ ज्योती आंगकाढे , विस्तार अधिकारी डी डी चव्हाण, आरोग्य सेवक नखाते, आरोग्य सहाय्यक डी एल राठोड, पि के चव्हाण, पी सी काळे, तर आशाताई वर्षा डांगे, कविता गंजेवाड, चंदा सोनुने, सुमन पडोळे रूपाली जाधव, सपना गोपेवाड,आयाशा बी मुखराम, आविर्णा कोंडरवाड, शोभा बच्चेवार, सुनिता भोसले, संगीता झिंझाडे, वंदना बेटकर, विशाखा मुरादे, अनिता गुंडेवार, अनिता पवार, शोभा राहुलवाढ नंदा कांबळे, इत्यादी आशाताई व कर्मचारी वृंद लाभार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.
