प्रतिनिधी-(प्रवीण जोशी)
उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेले निंगनुर हे गाव असून या गावची लोकसंख्या ही अंदाजे पंधरा ते सोळा हजार असून, क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही गावचा व्याप फार मोठा आहे. या ठिकाणी दोन तलाठी व दोन कृषी सहाय्यक कार्यरत असून,असा मोठा या गावचा व्याप आहे.त्यामध्ये निंगणूर येथील सर्वत्र शेतकरी बांधवांना याअगोदर पिक कर्ज काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ढाणकी हिच बँक होती. याच बँकेतून निंगणूर येथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी या बँकेतून पीक कर्ज काढले. येथील काही शेतकऱ्यांनी सोसायटीचे सभासद असल्याने फुलसावंगी येथील मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढले. त्यामध्ये ढाणकी येथील बँकेचे अंतर हे बाराच किलोमीटर आहे. व फुलसावंगी चे अंतर सहाच किलोमीटर आहे. आता फक्त उर्वरित राहिलेले पिक कर्जधारक शेतकरी वर्ग फक्त बोटावर मोजण्याइतके राहिले असून, त्यांनाच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उमरखेड येथे अंदाजे तीस किलोमीटर अतंरावर पाठवत आहेत . तेवढे अंतर पार करून पीक कर्जाची फाईल दाखल करावी लागत आहे. हि बँक येतील शेतकऱ्यांना फार लांब वर असून, त्रासदायक आहे. या बँकेमध्ये पीक कर्जाची फाईल दाखल केल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्यावर कार्यवाही केली जात नाही. शेतकऱ्यांना वेळेवर पिककर्ज दिल्या जात नाही. आमच्या बँकेचा व्याप फार मोठा आहे. असेही बोलल्या जाते. आणि शेतकऱ्यांनी फाईल दाखल केल्यानंतर तुम्हाला पिक कर्ज मिळण्यासाठी चार ते पाच महिने वाट पाहावी लागते. तुमचे सिबील चेक कराव लागते. असेही बँकेतील कर्मचाऱ्या मार्फत बोलल्या जाते. त्यामुळे माननीय दुय्यम निबंधक साहेब यांनी या सर्व बाबीचा विचार करून या शेतकरी वर्गांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उमरखेड च्या ऐवजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ढाणकी ही पूर्वीचीच बँक देण्यात यावी.कारण या बँकेत मार्गदर्शनही मिळते. आणि पिककर्जही जलदगतीने मिळते. पिककर्ज वाटपात स्टेट बँक अव्वल ठरली असून, या परिसरातील शेतकरीही सुखी समाधानी आहे. असे येथील शेतकऱ्यामार्फत बोलल्या जाते.
तरी दुयम निबंधक साहेब यांनी तसा प्रस्ताव पाठऊन पिक कर्जासाठी स्टेट बँक ढाणकी हीच बँक देण्याची मागणी निंगनुर येथील शेतकरीवर्गाकडून निवेदनातून केली.
