राळेगाव तालुक्यात तलाव खोलीकरण व सौंदरीकरण उद्घाटन सोहळा संपन्न ,ग्रामपंचायत अंतरगाव व रिलायन्स फाउंडेशन चा संयुक्त उपक्रम

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

           

राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे उदघाट्न समारंभास उपस्थिती मा.श्री रवींद्रजी कानडजे साहेब (तहसीलदार ),मा.श्री.केशवराव पवार साहेब,(गटविकास अधिकारी पं स.राळेगाव), मा.श्री. जितेंद्रजी चौधरी (रिलायन्स फाऊंडेशन जिल्हा प्रमुख व्यवस्थापक),मा.श्री. प्रविणराव येंबडवार (सरपंच ग्रापंचायत अंतरगाव)तसेच रिलायन्स फाऊंडेशन चे सर्व अधिकारी व सर्व ग्रापंचायत सदस्य व समस्त गावकरी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात बोलताना तहसीलदार साहेब आणि गटविकास अधिकारी साहेबांनी तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण जेवढी मदत करता येईल तेवढी मदत प्रशासन करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना तागडे हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोपिंचदजी ढाले यांनी केले.