राळेगाव तालुक्यातील जि. प. शाळा पिंपरी (सावित्री) येथील विद्यार्थ्यांचे महादिप परीक्षेत सुयश: तीन विद्यार्थ्यांची दिल्ली विमान वारी निश्चित

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 

राळेगाव तालुक्यातील खैरी केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपरी (सावित्री) येथील जि. प. शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी महाद्वीपपरिक्षा मध्ये प्राविण्य प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांची दिल्ली विमानवारी निश्चित झाली असून मागच्या वर्षी सुद्धा याच शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेत यश प्राप्त करून दिली विमान वारी निश्चित केली होती. या शाळेचे विद्यार्थी नेहमी या परीक्षेत यश प्राप्त करत असून त्यासाठी या शिक्षकांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांचे मागील वर्षापासून जि. प. महादीप उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना गौरवण्यात येते. शिक्षण अधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय फेरी मधून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय अंतिम फेरी दि. ५ मार्च २०२३ ला झाली. या अंतिम फेरीत प्रत्येक वर्गातून गुणानुक्रमे पहिल्या पाच मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये राळेगाव तालुक्यातील खैरी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या पिंपरी (सावित्री) येथील कु. श्रुती प्रकाश होरे वर्ग ५ वा, संस्कार प्रफुल सांभारे वर्ग ६ वा व अथर्व दत्तात्रय देवावार वर्ग ८ वा यांची दिल्ली विमानवारीसाठी निवड झाली. मागील वर्षी सुद्धा या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी महादीप परीक्षेत यश प्राप्त करून दिल्ली विमान वारी निश्चित केली होती हे विशेष. या परीक्षेमध्ये हे यश मिळवण्यासाठी राळेगाव पं. स. चे गटशिक्षणाधिकारी लूकमान शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विस्तार अधिकारी सरलाताई देवतळे, शेळके, केंद्रप्रमुख कुंभलकर सर, चांदोरे सर, कुंभारे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका तुळसाताई राजगडकर, शिक्षक संदीप कचवे सर महेंद्र कौरती सर, शिक्षिका दिपमाला वेट्टी यांना देतात. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील बोंडे, उपाध्यक्ष सिमाताई देवावार व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालकवर्ग तथा गावकऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.