आयुर्वेदिक दवाखाना टेमूर्डा येथे कोवीड 19 लसीकरण केंद्रावर गर्दी

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

आयुर्वेदिक दवाखाना टेमूर्डा येथे कोवीड 19 लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा दुसरा डोज देणें सुरू आहे .परंतु पहील्या लसीच्या डोज साठी युवा वर्ग खूप गर्दी करत आहे. व कोवीड 19 च्या नियमांची पायमल्ली होताना दिसतआहे.मास्क चा देखील वापर करित नसल्याने कोरोना ची तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही हेही तितकेच खरे आहे.प्रशासनाकडून मास्क चा वापर करा तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन ग्राम पंचायत प्रशासनाकडून केले जात आहे.