निंगनूर येथे स्वस्त धान्य दुकान दार येथे मारोती पंडागळे डीलर येथे आनंदाचा शिधा कीटचे वाटप


उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


निंगनूर स्वस्त धान्य दुकान येथे विलास तुळशीराम राठोड (पत्रकार )यांच्या हस्ते आनंदाचा शिधा कीटचे वाटप प्रथम येणाऱ्या लाभार्थीला देऊन नंतर वाटपाला सुरुवात करण्यात आली त्याच अनुषंगाने निंगनूर येथे आनंदाचा शिधा योजने अंतर्गत निंगनूर परिसरातील लाभार्थी धारकांना प्रत्येकी 100रुपये प्रमाणे आनंदाचा शिधा वस्तूचे वाटप करण्यात येत आहे शेतकरी, लाभार्थी प्रधान्य, अंत्योदय असे सर्व धारकांना आनंदाचा शिधा कीटचे वाटप करण्यात आले व झालेल्या मराठी नववर्ष गुडी पाडवा निमित्य व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने,, आनंदाचा शिधा दिनांक 13एप्रिल गुरुवार रोजी वाटप करण्यात आले राज्य सरकारने 100रुपयात शिधा वस्तूचे पॉकेट जाहीर केले होते यात साखर एक किलो, रवा एक किलो चणाडाळ एक किलो, तसेच पामतेल एक लिटर या चारखाद्य वस्तूचा समावेश करून एका आनंदाचा शिधा म्हणून एका थैलीत पॉकेज करून वाटप करण्यात येत आहे