
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगांव :तालुक्यातील धानोरा येथील बाबाराव वामन गालाट वय ६० वर्ष तर विठ्ठल बापूराव गेडाम वय ५५ वर्ष हे दोघेही आज दिं २९ ऑक्टोबर २०२२ रोज शनिवारला राळेगाव येथे दुचाकीने जात असताना कोपरी गावाजवळ डुक्कराने जब्बर धडक दिल्याने गंभीर जमखी झाले आहे.
सवित्तर वृत्त असे की बाबाराव गलाट व विठ्ठल गेडाम हे दोघेही पीएम किसान योजनेचे पैसे काढण्यासाठी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान राळेगांव येथे जात असताना कोपरी गावाजवळ भरधाव वेगात दुचाकीला डुक्कराने जबर धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता विठ्ठल गेडाम यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गेडाम यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे तर बाबाराव गलाट यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आहे याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले आहे असून या डुक्करच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या जखमींना वनविभागाकडून उपचाराकरिता आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबाकडून केली जात आहे.
