खैरी केंद्रातील कु. श्रुती होरे व दीक्षा काळे या दोन विद्यार्थिनीचे नवोदय परीक्षेत दैदीप्यमान यश
(कू.श्रुती होरे ओपन सिलेक्शन लिस्ट मध्ये जिल्ह्यातून तिसरी)

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

खैरी केंद्रामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी( सावित्री) ची विद्यार्थिनी कुमारी श्रुती प्रकाश होरे तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव ची विद्यार्थिनी दीक्षा लीलाधर काळे या विद्यार्थिनींनी२९ एप्रिल रोजी झालेल्या नवोदय परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून राळेगाव तालुक्यातून खैरी केंद्राचे नाव उज्वल केले आहे. पिंपरी सावित्री शाळेची विद्यार्थिनी श्रुती होरे ही विद्यार्थिनी ओपन सिलेक्शन लिस्ट मध्ये जिल्ह्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला हे विशेष.
नुकताच २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात राळेगाव तालुक्यातील खैरी केंद्रामधील पिंपरी (सावित्री) येथील पाचव्या वर्ग शिकत असलेली प्रकाश होरे यांची सुकन्या श्रुती होरे हीने ओपन सिलेक्शन लिस्ट मध्ये जिल्ह्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील लीलाधर काळे यांची सुकन्या दीक्षा काळे हीने सुद्धा नवोदय परीक्षेत दैदीप्यमान यश प्राप्त करून राळेगाव तालुक्यातील खैरी केंद्राचे नाव उज्वल केले आहे. पिंपरी सावित्री शाळेची कुमारी श्रुती होरे व दहेगाव शाळेची कुमारी दीक्षा काळे या जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही विद्यार्थिनींनी नवोदय परीक्षेत मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी (सावित्री) ची विद्यार्थिनी कु. श्रुती खोरे हिने आपल्या देशाचे श्रेय शाळेचे शिक्षक संदीप कचवे, महेंद्र कौरती शाळेच्या मुख्याध्यापिका राजगडकर मॅडम, वेट्टी मॅडम वआपल्या आई-वडिलांना दिले तर दहेगाव शाळेची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा काळे हीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व केंद्रप्रमुख कुंभलकर सर व शाळेतील शिक्षकांना दिले आहे. खैरी केंद्रातील या दोन्ही विद्यार्थिनीने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे गट शिक्षणाधिकारी लुकमन शेख, शिक्षण विस्तार अधिकारी देवतळे मॅडम, शेळके सर तसेच केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर सर यांनी अभिनंदन केले.