विज्ञानातीला नव नवीन आविष्कार हे विद्यार्थ्यांना प्रेरक ठरतात – डॉ. अशोक उईके

सहसंपादक: रामभाऊ भोयर

मार्कंडेय पब्लिक स्कूल येथे इस्रो स्पेस सायन्स व विज्ञान भारती विदर्भ प्रदेश आयोजित अंतरिक्ष महायात्रेचे आयोजन मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे येथे दि. ५ सप्टेंबर ला आयोजित करण्यात आले होते. त्यात राळेगाव व परिसरातील सर्व माध्यमांच्या शाळेच्या किमान २२०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला. फिरत्या अंतरिक्ष महायात्रे च्या माध्यमातून अंतराळातील संपूर्ण तंत्रज्ञान विद्यार्थ्यानी आत्मसात करून अभ्यासपूरक माहिती प्राप्त केली.
फिरते अंतरिक्ष यात्रेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मा. श्री. डॉ. अशोकजी उईके सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अमित भोईटे, तहसीलदार राळेगाव यांनी भूषविले तसेच प्रमुख उपस्थितीत श्री. चित्तरंजन कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य, बबनराव भोंगारे माजी नगराध्यक्ष राळेगाव, श्री. किशोर जूनूनकर माजी नगर सेवक राळेगाव हे होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव तथा नगरसेवक नगरपंचायत राळेगावचे डॉ. संतोष कोकूलवार व संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शीतल बलेवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉ. अशोकजी उईके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.