।।विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी सहज योग जरुरी – शरद दादा पाथरकर।।

राळेगाव- दिनांक 11 जानेवारी रोजी संत गाडगेबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे परम पूजनीय श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहज योग यावर विद्यार्थ्यांसाठी ध्यान संत्र आयोजित करण्यात आले होते.आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला भौतिक सूविधेनी तणावग्रस्त केले,त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही,तो सतत तणावाखाली वावरत असतो.परिक्षा म्हटले की तो भयभीत होतो,या सर्वांवर उपाय म्हणजे सहज योग, सहज योग नियमित पणे केल्याने तनाव मुक्त जीवन सहजपणे जगता येते, आत्मसाक्षात्कारा ची अनुभुती होते, व्यसनमुक्ती व जीवन आनंदाने जगता येते, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व त्याही पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहज योगा ने साध्य होतो असे शरद दादा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.आजच्या या कार्यशाळेचे आयोजन महायोग सहज योग ध्यान केंद्र राळेगाव व गाडगे महाराज विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. प्रमुख वक्ता म्हणून श्री शरद दादा पाथरकर, सदस्य महाराष्ट्र सहज योग ध्यान समिती ईडा,पिंगला व स्नुषुम्ना नाडी म्हणजे भुत, वर्तमान व भविष्य अशी सोपी मांडणी करून त्याचे जीवनात काय महत्त्व आहे हे पटवून दिले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राळेगाव सहज योग ध्यान केंद्राच्या समन्वयक सौ सारिका सुनील बोरसरे, सहज योग केंद्राच्या सदस्य वैशालीताई झलके, सुनीलभाऊ झलके, कुडसंगे दादा, बोरसरे दादा, वैशालीताई एकुणकर, भाग्यश्री ताई मांडवकर, खरजे ताई, कोवे ताई, ईरपाते ताई, डहाके ताई, खुनकर ताई, युवाशक्ती यझेश, दिक्षा. अभिजीत हजर होते. संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेश शर्मा आणि शिक्षक व प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशालीताई झलके व आभार प्रदर्शन सारिका ताई बोरसरे यांनी केले.