

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी:: शेख रमजान
गोरगरीब रुग्णांना लागणारी औषधेही ढाणकी शासकीय रुग्णालयात (खोकल्याचे औषधं ) उपलब्ध नाहीत.खासगी मेडिकलमधून नाइलाजाने जादा पैसे देऊन खोकल्याचे औषध खरेदी करावे लागत आहे.
ढाणकी येथे सर्दीं, खोकल्याची मोठ्या प्रमाणात साथ आहे. याबरोबरच डेंग्यू,मलेरियाची काही प्रमाणात साथ आहे. सर्वाधिक खोकल्याचे प्रमाणआहे.हवामानातील बदलामुळे खोकल्याच्या रुग्णाची संख्या जास्त आहे.
ढाणकी शासकीय रुग्णालयात खोकल्यावर प्रभावी असणारे
औषध मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची तालुका व ग्रामीण मध्ये संसर्गजन्य आजारांचा विळखा वाढला असतानाच औषधं उपलब्ध नाहीत. सर्व प्रकारच्या औषधांचा तुटवडा तेथे आहे. एरवी पैसे नाहीत म्हणून औषधांची खरेदी केली जात नाही आमदार ससाणे यांनी या रुग्णालयाला भेट देऊन औषधाचा साठा वाढवाण्याची ताकीद देऊन सुद्धा ढाणकी रुग्णालय मध्ये औषधं उपलब्ध नाही.
ढाणकी गावातील दररोज दोनशे ते तीनशे रुग्ण तपासले जातात. त्यामुळे येथील औषधं दोन ते चार दिवसात संपतात असे या रुग्णालयातील डॉक्टर सांगतात.
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अथवा ॲडमिट रुग्ण तपासल्यानंतर डॉक्टर औषधे लिहून देतात. औषधे आजवर नेहमी ‘ढाणकी शासकीय दवाखान्यात ’मध्ये उपलब्ध असत. पण, काही दिवसापासून औषधांचा तेथे तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना कोणत्याच प्रकारची औषधे मिळत नाहीत. खोकल्यावरची औषधे, विविध प्रकारचे मलम, रेबीज लस हे सरकारी पैशातूनच दिले जातात. ‘शासकीय दवाखान्यात येणारे रुग्ण हे गरीब असतात. त्यामुळे सरकारी पैशांतूनच त्यांना औषधे दिली जातात.
यातच दवाखान्यात औषधं उपलब्ध नसल्यामुळे येथील गरीब रुग्णाची परेशानी होत आहे. यावर ढाणकी येथील नागरिक शासकीय रुग्णालयात औषधं साठा वाढवण्याची मागणी करत आहे
:ढाणकी शासकीय रुग्णालयात औषधं तुटवडा च्या संमस्यावर म्हणाले की दररोज दोनशे ते तीनशे रुग्ण तपासले जातात त्यामुळे येथील रुग्णालय मध्ये औषधं दोन ते चार दिवसात संपतात. यावर आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी (dho)यांना पत्र दिला असून खोकला सर्दीच्या रुग्णाची ढाणकी गावात संख्या जास्त आहे. हे औषध तत्परतेने उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.शासनाकडून पुढील काही दिवसांत ते उपलब्ध होईल.”
–डॉ.बालाजी राहुलवाड शासकीय रुग्णालय ढाणकी
