
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव भारी येथील सज्जनगडावरील दुहेरी हत्याकांडाची चौकशी ‘सीआयडी’मार्फत करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघाने केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. सज्जनगडावर महिनाभरापूर्वी शेंडे • महाराज आणि त्यांच्या शिष्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली; परंतु पोलिसांनी दाखविलेल्या जप्तीच्या मुद्देमालाविषयी संशय व्यक्त करण्यात आला. शेंडे महाराजांकडे असलेले सोने, त्यांच्याकडे असलेली रक्कम प्रत्यक्ष तपासात कुठेच दाखविली गेली नाही. महाराजांची संपत्ती राष्ट्राला द्यावी; परंतु जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा आणि रकमेचा खरा आकडा पुढे आला पाहिजे, असे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.
निवेदन देताना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल, विलास काळे, किशोर सुरकर, रवी चरडे, सुरेश वडतकर, महाराजांचे नातू गोपाल बुरले, विशाल बुरले, नरेंद्र रामेकर, अशोक मोहरले, भालचंद्र तेलंग, नरेंद्र भांडारकर, अशोकराव कोल्हारकर, मारोतराव गोल्हर, गजानन शेंडे, प्रकाश रेड्डी, महादेव बोरले, प्रभाकर बोरले, ज्ञानेश्वर शेंडे, गोपाळ शेंडे, प्रमोद वरभे, देवीदास शेंडे, गजानन पोयाम, सुनील कावलकर, राम निकोरे, विश्वास धावणे, दिगंबर शेंडे, गजानन बुटले, बंडूजी बुटले, गजानन कराळे, सुषमा शेंडे, गीता शेंडे, अर्चना वरुडकर, वैष्णवी वरूडकर, रोशनी बोरले सुनील बोरले एन.आर. मुळे, नीलेश वडे आदी उपस्थित होते.
