
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वरूड(जहागीर)–
येथील स्थानिक शेतकरी अंकुश किशन चव्हाण यांच्या शेतातील ठेवलेले १०० नग पाईप कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याची घटना २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रं दहा ते अकरा च्या दरम्यान घडली.
याची रितसर तक्रार एका निवेदनाद्वारे दाखल केली आहे..
एका बाजूच्या शेतकऱ्याला हे माहित पडताच त्यांनी शेतमालका पर्यंत ही माहिती पोहोचवली.माहिती मिळताच शेतकरी अंकुश किशन चव्हाण शेतात धावले. त्यांनी शक्य तितक्या प्रकारे पाणी टाकून पाईप वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढी वाढून होती की काहीच उपयोग झाला नाही. काही मिनिटांतच सर्व पाईप जळून राख झाले. घटनेमुळे त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून तो या पाईपांवर शेतीच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी अवलंबून होता.वर्षभरात जमत-जमत त्यांनी पाईप खरेदी केले होते. या हंगामात पाण्याची सोय करण्यासाठी हे पाईप खूप महत्त्वाचे होते. पण एका रात्रीत सर्वस्व जळून गेल्याने त्यांचे मन कोसळल्यासारखे झाले. एवढे नुकसान अचानक आले की पुढे शेती कशी करायची, नवीन पाईप कसे आणायचे?, हंगाम कसा सांभाळायचा? याची चिंता त्यांच्या मनात सतत फिरत आहे.शेतकऱ्याला झालेल्या या मोठ्या नुकसानीची भरपाई कशी होणार?, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे? हे विशेष .
