झरगड येथील विरोधकांना विकास कामाचा होतोय त्रास : सरपंच चंदा आत्राम

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झरगड,सोयटी,मांडवा ही गट ग्राम पंचायत असून या ग्रामपंचायतीचे पद हे आदिवासी महिलांसाठी राखीव असून या गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.चंदा मोहन आत्राम असून या महिला सरपंचांनी मागील काही वर्षांपासून झरगड या गावात अनेक विकासकामे केली असून सोयटी व मांडवा गावातील अनेक विकासकामे केली आहे. ही विकासकामे एका आदिवासी महिला सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन केली असून अशा प्रकारच्या होत असलेल्या विकासकामात गावातील प्रस्थापित विरोधकांना गावातील केलेली विकासकामे बघवत नसल्याने त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटत असावे.म्हणून त्यांनी गावातील तरूणांना हाताशी पकडून तक्रार केली असून गेल्या दहा वर्षांपासून झरगड,सोयटी,मांडवा गावातील रखडलेली विकासकामे गेल्या 2021 पासून बरीचशी पूर्णत्वास आली असून दिनांक ७/१०/२०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेत झालेल्या विकास कामाची माहिती देण्यात आली. कारण केलेली कामे ही कुठल्याही ठेकेदारांनी केली असली तरी सर्व कामे ईस्टीमेटप्रमाणे केली असून तशाप्रकारची संपूर्ण विकासकामाची माहिती नुकतीच पार पडलेल्या ग्रामसभेत नागरिकांना दिली विरोधकांनी पंचायत समितीकडे अर्ज दाखल केला असून या प्रकरणी जी सत्यता येईल त्याला आपण सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे झरगड ग्राम पंचायत सरपंच सौ चंदा मोहन आत्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.