
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सद्यस्थितीत बऱ्याच भागातील कपाशीची अवस्था ही वनवा लागल्यागत झाली आहे झाडाला वनवा लागल्यावर जसे झाड होतं तशा पद्धतीची अवस्था ही कपाशीची झाली आहेत।।। सद्यस्थितीत कपाशीच्या झाडाची पाने फुल पाती हे सगळे झडले आहेत झाडाला आग लागल्यावर जशी झाडाची अवस्था होते तशी सद्यस्थितीत कपाशीची झाली आहेत सतत पडलेला पाऊस व त्यानंतर पावसाने दिलेली उसंत यामुळे कपाशीची अवस्था अशी झाल्याचे बोलले जाते केवळ दोन वेळेच्या वेच्यामध्ये कपाशीची अवस्था अशी झाल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत राळेगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश शेतातील कपाशीचे पीक असे झाले आहेत दोनच वेच्यामध्ये कपाशीची उलगवाडी झाल्याने कपाशी वरती झालेला खर्चही शेतकऱ्यांचा निघाला नाही दुसरीकडे भावही नाही आणि उत्पन्नही नाही अशा दृष्ट चक्रात सध्या कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहेत कपाशीची अवस्था अशी का झाली याबाबत शेतकऱ्यासह संबंधीत सर्व विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसते पण कपाशीवर आलेल्या या रोगाने कपाशीचे मात्र पुरती वाट लावलेली आहेत कपाशीला आता कुठलिही चाल नसल्याने कपाशीची उलनवाडी झाल्यात जमा आहेत कपाशीची ही अवस्था सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा सुद्धा विषय ठरत आहे अनेक शेतकरी आपल्या शेतातील कपाशी टाकून कपाशीला बनवा लागल्याचे गीत टाकत आहेत गेल्या महिन्यामध्ये एखादा जरी पाऊस झाला असता तर कपाशीचे चित्र वेगळे राहिले असते पण असे झाले नाही त्यामुळे कपाशीला वनवा लागल्या गत अवस्था झाली आहेत या अवस्थेमध्ये कपाशी बरोबरच शेतकरी हा सुद्धा विजल्यासारखा झाला.
