परीक्षा महाराष्ट्रातील पदभरती साठी पण परीक्षा केंद्र मात्र उत्तरप्रदेश चे ,आरोग्य विभागाच्या पदभरतीचा गोंधळ

  • Post author:
  • Post category:इतर

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये. येत्या 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रेवशपत्रावर तसे नमूद करण्यात आहे. परीक्षा ही माहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र परिक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशातील मिळाले आहे. सरकारच्या या अजब कारभारामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. (maharashtra health department recruitment student got uttar pradesh exam center on his admit card)

विद्यार्थ्याला थेट उत्तर प्रदेशचे परीक्षा केंद्र
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी 25 सप्टेंबर आणि गट ड संवर्गातील पदासाठी 26 सप्टेंबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्रदेखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र दत्ता पतुरकर या परीक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेश राज्यातील मिळाले आहे. हा अजब प्रकार समोर आल्यामुळे परीक्षेआधी योग्य ते नियोजन करावे, तसेच माझी अडचण दूर करावी अशी मागणी दत्ता पतुरकरकडून केली जात आहे.