तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या मात्भूमी फाउंडेशनच्या कार्यकर्ते
29/11/2021 रात्री 10 च्या सुमारास विठाळा वार्ड येथे लग्नाचा इंवेट आटपून घरी जात असताना गजानन हाके यांच्या पाणपट्टी जवळ कार्यकर्ते उभे असताना .
वंसत नगर पोलीस स्टेशन चे API संजय मातोंडकर यांनी सतिष शेवाळकर मातृभूमी संघटना अध्यक्ष, शैलेश उत्तरवार व.पुसद शहर तालुका अध्यक्ष .अविनाश सरगर ,
गजानन हाके यांना दमदाटी करून गाडीत टाकून पो स्टे स्टेशन. नेले त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला सर आमचं काम सामाजीक आहे आम्ही ..
मातृभूमी फाउंडेशन चे कार्यकर्ते आहोत तरी आम्हाला कलम १४४ ची भिती दाखवत तुम्हचे हे सामाजिक काम बंद करा असे म्हणत पो स्टे स्टेशन मध्ये नेऊन सर्वाना अट्टल गुन्हेगारा सारखे बसवून API मातोडकर यांनी अश्चिल भाषेत शिवीगाळ करून या सामाजीक कार्यकर्त्याच्या कोऱ्या कागदावर सही घेत पुन्हा सामाजिक काम कराल तर याद राखा म्हणत दम देत सोडून दिले…
मातृभूमी फाउंडेशन शहरातील सामाजिक कामे करणारी संस्था आहे अशा सामाजिक काम करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आपली मर्दानगी दाखवण्यापेक्षा वंसत नगर पो.स्टे. अंतर्गत गुन्हेगारी वाढली असून खुन चोरी चाकूहल्ला च्या घटना रोज च होत आहेत त्यांवर अंकुश ठेवत गुड प्रवृत्तीच्या लोकांना मर्दांगी दाखवली शांतता होण्यास मदत होईल
यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
