पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप पाटील तर उरण तालुकाध्यक्ष पदी पंकज ठाकूर.

प्रतिनिधी:विठ्ठल ममताबादे
पत्रकार, उरण, नवी मुंबई
व्हाट्सअप नंबर -9702751098.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या भारतातील अग्रगण्य असलेल्या भारतीय पत्रकार संघ (Association of indian journalists )या पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी उरण तालुक्यातील बोकडवीरा गावचे रहिवाशी तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांची तर रायगड जिल्हा सचिव पदी महेश ठाकूर(अलिबाग )यांची तर उरण तालुकाध्यक्ष म्हणून कोप्रोली येथील रहिवाशी पत्रकार पंकज ठाकूर यांची निवड वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात आली आहे.

भारतीय पत्रकार संघ (AIJ )चे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद सईद शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र व गोवा प्रभारी-जयपाल पाटील, राष्ट्रीय संघटन सचिव -रवींद्र नेरकर, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष -राजेंद्र गर्दे,प्रदेश संघटक -अनिल सोनावणे,महाराष्ट्र मुख्यसचिव विवेक देशपांडे, कोकण विभाग अध्यक्ष -नंदकुमार धोत्रे,रायगड जिल्हाध्यक्ष-सुभाष म्हात्रे यांच्या शिफारशीनुसार पत्रकारिता क्षेत्रातील योगदान व कार्य पाहता प्रदीप पाटील यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष, महेश ठाकूर यांची जिल्हा सचिव तर उरण तालुकाध्यक्ष पदी पंकज ठाकूर यांची निवड भारतीय पत्रकार संघ (AIJ )च्या पदी करण्यात आली आहे.

सदर निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडिया द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उरण मधील दैनिक सकाळचे पत्रकार सुभाष कडू, पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.कायदा व पत्रकारिताच्या नियमांचे पालन करून पत्रकार संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गक्रमण करणार असून पत्रकारांच्या हितासाठी नेहमी कार्यतत्पर राहणार असल्याचे प्रदीप पाटील, महेश ठाकूर, पंकज ठाकूर या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.