13 मार्चला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी राष्ट्रीय खुले अधिवेशन

भरारी स्मरणिकेचे प्रकाशन व उल्लेखनीय कामगिरी बजावणा -यांचा अधिवेशनात होणार सन्मान

सर्व पत्रकारांनी सहभागी होण्याचे आव्हान!
चंद्रपूर- पंचवीस वर्षाची विविध क्षेत्रात घोडदौड करीत राष्ट्रीय स्तरावर २१०० सदस्यांचे एकमेव नेतृत्व करीत असलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे “रौप्यमहोत्सवी” पत्रकारांचे राष्ट्रीय खुले एक दिवसीय अधिवेशन १३मार्च २०२२ रोज रविवार ला हॉटेल प्राईम पार्क एमआयडीसी जुना बायपास रोड अमरावती येथे आयोजित केले असून, सदर एक दिवसीय अधिवेशन विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांसाठी खुले राहणार आहे. दोन सत्राचे नियोजन असलेल्या अधिवेशनाचे पहिले सत्र सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. दिनांक १३ मार्च ला सकाळी ९ ते १० वेळेत पत्रकार नोंदणी सकाळी १० वाजता अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार यशोमती ताई ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, या सत्राच्या अध्यक्षस्थानी आय एन एस समितीचे कार्यकारी सदस्य व दैनिक हिंदुस्थान चे संपादक विलास मराठे हे राहणार आहेत. विशेष अतिथी आमदार रामदास आंबटकर, विभागीय माहिती कार्यालय अमरावती चे उपसंचालक हर्षवर्धन पवार, दै. विदर्भ मतदार चे संपादक दिलीप एडतकर, उद्योजक चंद्रकांत उपाखय् लपीसेठ जाजोदिया, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे ,दै. वृत्त केसरी चे संपादक जय रामजी आऊजा यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी पत्रकार संघाच्या भरारी स्मरणिकेचे विमोचन व प्रकाशन होणार असून, याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत होणाऱ्या दुपारच्या सत्राचे उद्घाटन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण ,कामगार, महिला व बालकल्याण व विमुक्त जाती जमाती कल्याण, जलसंपदा राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. या सत्राचे अध्यक्षस्थानी दै.प्रतिदिन चे संपादक नानक आहुजा, विशेष अतिथी म्हणून आमदार प्रताप अडसड, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, दै. जनमाध्यम चे संपादक प्रदीप देशपांडे, वरिष्ठ पत्रकार शिवराय कुलकर्णी आदींची उपस्थिती राहणार आहे या सत्रात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वेबसाईट चे उद्घाटन समारंभ व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकारांच्या राष्ट्रीय खुले एक दिवसीय अधिवेशनात सर्व पत्रकारांनी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहाण्याचे आव्हान संघाच्या केंद्रीय कार्यकारणी चे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापु देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावुल, महाराष्ट्र सरचिटणीस प्रा.रवींद्र मेंढे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र तिराणिक यांनी केले आहे.