माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांचे वडकी येथे जंगी स्वागत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राष्ट्रीय अध्यक्ष मागासवर्गीय आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर हे चंद्रपूर येथून वडकी मार्गे अमरावती येथे जात असताना त्यांचे वडकी येथे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी हंसराज भैय्या अहिर यांनी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व आपल्या पुढील दौऱ्या करिता अमरावती येथे निघाले.यावेळी स्वागत करताना भाजप जिल्हा सचिव सचिन डोरलीकर, भाजपा महिला जिल्हा सचिव सौ विद्याताई लाड, भाजपा जिल्हा सदस्य विशाल पंढरपूरे, श्रीरंग चापले, वडकी गावचे सरपंच शैलेश बेलेकर, पिंपळापूरचे सरपंच रवी चौधरी, माजी सरपंच दिलीप कडू,निखिल शेळके,अनिल नंदुरकर, शारदानंद जयस्वाल उमेश पामपट्टीवार, वसंतराव उपाते,मोहित जयस्वाल ,कुणाल केराम, रंजीत ठाकरे,शरद उघडे,अरुण बोरपे,जगदीश गोबाडे या गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.