ढाणकी शहरात श्रीराम जन्म उत्सव उत्साहात साजरा

ढाणकी प्रतिनिधी: प्रवीण जोशी


संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा जन्म उत्सव ढाणकी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जुने बसस्थानक येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. एकवचनी ,एक बानी प्रभू श्री राम की जय अशा घोषणांनी आजूबाजूचा परिसर दणाणून निघाला. तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मंदिरात सुद्धा तेवढ्याच उस्फूर्त पद्धतीने श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला शहरातील अनेक ठिकानाच्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यात बऱ्याच जणांनी प्रभू राम यांचे गीत रामायण मधील गीते गाऊन जन्मोत्सव साजरा केला तसेच महिलांनी सुद्धा ठिकठिकाणी दीपोत्सव करून सुबक अशी रांगोळी ची आरास काढून प्रभू श्रीराम यांना वंदन केले व महिलांनी सुद्धा तेवढ्याच थाटामाटात प्रभू रामचंद्र जन्मोत्सव साजरा केला . व दुपारी भव्य दिव्य अशी मुख्य मिरवणूक मार्गे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती शोभा यात्रेमध्ये मध्ये तरुणांबरोबरच चिमुकली व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील तेवढ्याच प्रमाणात दिसून आला यावेळी तरुणाईचा उस्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला.मोटार सायकलला भगवा ध्वज,तर कुणाच्या चार चाकी वाहनाला प्रभू रामचंद्र असलेला ध्वज, व तरुणांनी भगवा फेटा बांधून प्रभू श्रीराम यांच्या नावाचा जयघोष करत जय श्री राम, राजा रामचंद्र की जय अशा घोषणांनी ढाणकी नगरी दुमदुमून निघाली. दरम्यान श्री राम यांच्या गाण्यावर ठेकाघेत तरुणाई व चिमुकल्यांनी आनंद घेतला. पोलिस प्रशासनानी विशेष कामगिरी बजावली जागोजागी पोलिस बंदोबस्त होता.कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता प्रभू श्रीराम जन्मोत्सव अतिशय शांततेत साजरा करण्यात आला.