
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि २९/१२/२०२४रोजी महिलांचे कायदे आणि व्यसनमुक्ती व समाजाची जडणघडण या विषयावर सविस्तर चर्चा केली. दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व सांगून व्यसनमुक्ती मार्गदर्शन केले व व्यसनमुक्ती ची विद्यार्थांना शपथ अड. रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. साक्षी दुमनवार म्यडम, प्रमुख अतिथि प्रा. गजानन जाधव , जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यवतमाळ, व प्रा.भाष्करराव गरज पर्यवेक्षक फुलसिंग नाईक महा. पुसद यांनी राष्ट्रीय सेवा योजना संदर्भात माहिती दिली. प्रा. चौधरी,यांनी प्रास्ताविक केले. प्रा.झाडे , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.नवीन वर्ष धुंदीत नाही शुद्धित साजरे करा,असे आवाहन करण्यात आले.
