
🔸यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार
🔸खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती
🔸 राळेगाव मतदार संघात खळबळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील राजकारणात दबदबा असलेले तसेच नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष कॉग्रेसचे जानराव गीरी तसेच इतर चार नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई येथे शिवसेनेच्या युवासेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच विधान परिषदेच्या आमदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. या घटनेने राळेगाव मतदार संघातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
कॉग्रेस कार्यकर्ते जानराव गीरी हे गेल्या अनेक वर्षापासून राळेगाव परिसरात राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. सध्या ते राळेगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या जानराव गीरी, नगर सेवक भानुदास राऊत, प्रतिक बोबडे, गणेश कुडमेथे, अनिल डंभारे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार, यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर उपस्थित होते.
भावना गवळी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो व कोणी कोणाचा शत्रू नसतो, ही म्हनं सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे आ. भावनाताई गवळी पाटील यांनी लोकसभेच्या अनेक निवडणुकांमधून दाखवून दिले आहे. काही अपवाद वगळता यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील राजकारण्यांचा गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे गेला 25 वर्षापासून दिसून येत आहे. आता देखील दोन-तीन महिन्यापासून यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा व राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे दिसून येते.
शिवसेना प्रबळ करणार
शिवसेनेच्या सामाजिक कार्यामुळे तसेच वाढत्या प्रभावामुळे अनेक जन शिवसेनेत प्रवेश घेत आहे.आम्ही त्यांचे स्वागत करीत आहो. यवतमाळ जिल्हयात शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेत्रृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना आनखी प्रबळ करण्याचे आमचे ध्येय आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या प्रत्तेक भागात शिवसेनेच्या शाखा काढण्यासाठी तसेच शिवसेना मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे.
भावनाताई गवळी
आमदार, विधान परिषद
