
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील तलाठ्यांना मुख्यालय राहण्याची एलर्जी होत असल्याची दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे शासनाने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी गाव तिथे तलाठी कार्यालय उभारले आहे. परंतु या तलाठी कार्यालयाचा विसर सध्या रिधोरा येथील तलाठ्यांना पडला असल्याचा दिसून येत आहे. या परिसरातील बऱ्याच गावामध्ये तलाठी कार्यालय उभारले आहे परंतु तलाठी फक्त एक ते दोन दिवस कार्यालयात हजेरी लावून बाकी दिवस तालुक्याच्या व मंडळ विभागाच्या कार्यालयातून काम पाहत असल्याची ओरड सध्या शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. शासनाने शेतकऱ्यांची गैरसोय न होण्यासाठी गाव तिथे तलाठी कार्यालय उभारले आहे परंतु तलाठी मुख्यालय न राहता तालुक्याच्या ठिकाणावरून काम पाहत असल्याचे दिसून येत आहे.सदर तलाठ्यांना मुख्यालय राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कार्यालय उभारले आहे. परंतु या कार्यालयाचा वापर तलाठ्यांकडून होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे तर रिधोरा येथील तलाठी फक्त एक ते दोन दिवस कार्यालयात येऊन हजेरी लावतात व बाकी दिवस वडकी तसेच राळेगाव वरून काम पाहत असल्याचे शेतकरी वर्गांकडून सांगितले जात आहे. तर तलाठी मुख्यालय राहत नसल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना नाहक सहन करावा लागत आहे हप्त्यातून एक ते दोन दिवस तलाठी फक्त कार्यालयाला हजरी देऊन जात असतात बाकी दिवस वडकी येथील कार्यालयात बसत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे एखादा सातबारा किंवा अन्य काही कागदपत्राची आवश्यकता पडल्यास तलाठी वडकीला किंवा राळेगावला बोलावत असल्याचे येथील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे तर सातबारा साठी किंवा अन्य काही कागदपत्रासाठी शेतकऱ्यांना वडकी किंवा राळेगाव येथे कामकाजासाठी जाणे म्हणजे शेतकऱ्यांवर आर्थिक मृदंड बसणे मग शेतकऱ्यांच्या सोयीसुविधीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बिल्डिंगचे काय ? असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे. सदर संबंधित अधिकाऱ्यांनी तलाठ्यांना हप्त्यातून किमान पाच दिवस मुख्यालय राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी येतील शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे
