
सहसंपादक : रामभाऊ भोयर
१ ऑगस्ट थोर महापुरुष यांच्यासाठी जयंती आणि पुण्यतिथी साठी सर्व घटकांतील लोकांसाठी प्रेरणा दिवस होता अशा थोर महापुरुषांच्या आठवणी म्हणजे हुतात्म्यांना स्मरण म्हणजे “‘ हुतात्मा दिवस “‘ आहे असे लोकाप्रती दिसून येत होते, म्हणून आम्ही पायाभूत सुविधांचा अभाव असलेलं गाव “‘ मांडवा “‘ राळेगाव विधानसभा क्षेत्रातील निवडले आणि तेथे कोलाम समाजाचे प्रेरणा,प्रतिक म्हणून शामा दादा कोलाम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा कृष्णा जी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ, मा श्रावण पाडसेनेकुन (कोलाम समाज सेवक ) मा विश्वास कुंभेकर ( सामाजिक कार्यकर्ते ) मा हर्षल आडे जिल्हा सचिव ( गोंडवाना एकता परीषद ) मा कविता धुर्वे ( पत्रकार ) तथा सामाजिक कार्यकर्त्या राळेगाव तालुका प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते विशेष सहभाग म्हणून मा हुसेन खोरद ( सखी ) मा कोवे साहेब ( माजी सरपंच ) मा बाजीराव लोनकर ( लोणी ) आणि संजय मेश्राम उपस्थित होते. मेळाव्यात सर्व गावकरी आणि समाज बांधव सहभागी झाले होते पाहुण्यांचे स्वागत आणि आदरतिथ्य सन्मान मोठ्या प्रमाणात केला विशेषतः सोशल मीडिया प्रमुख विनोद माहुरे यांनी शामा दादा कोलाम पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम कव्हर करुन गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोदविल्या मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले आपण आम्हाला सन्मान दिला आपल्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी प्रयत्न करु कारणं सरकार फक्त प्रलोभने दाखवून समाजाची दिशाभूल करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावातील पायाभूत सुविधांची पूर्तता केली पाहिजे अशा समस्या जिल्हा स्तरावर लावून घरु असे आश्वासन मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी अध्यक्षीय भाषणात लोकांना दिले आहे कार्यक्रम सुत्रसंचलन अनिकेत मुरार ( युवा नेतृत्व मांडवा ) यांनी केले तर यशस्वी सहभाग विठ्ठल भाऊ कासार , सुनील भाऊ हजारे , लक्ष्मण जुनगरे विशाल मुरार अभिषेक आतराम समिर घोटेकर, नामदेव रामगडे, प्रकाश जतकर आणि समस्त गावकरी महिला पुरुष सहभागी झाले होते
