
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील येत असलेल्या लाडकी येथील स्टॉप वर गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशी निवारा नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे ,प्रवाशी निवाऱ्यासाठी लाडकी येथील ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना सुचविले पण आजपर्यंत लाडकी गावाला प्रवाशी निवारा झाला नाही,प्रवाशी निवारा नसल्याने ग्रामस्थांना उन्हातान्हात पावसाळ्यात रोडवरच ताटकळत उभे राहून बसची वाट पहावी लागत असते,त्यामुळे उन्हाचे चटके,पावसाळ्यात पाऊस याचा मारा लाडकिवासीयांना सोसावा लागतो त्यामुळे ग्रामस्थाचे मोठे हाल होते, या गंभीर बाबीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आतातरी लाडकी गावाला स्टॉपवर प्रशस्त प्रवाशी निवारा देण्यात यावा अशी मागणी लाडकी येथील शंकरभाऊ राऊत,मोहनभाऊ गुदडे, अभयभाऊ मांडवकर,रामदासभाऊ मांडवकर,शेखरभाऊ मांडवकर,श्यामभाऊ मांडवकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
