
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आपण समाजात राहतो आणि समाजाप्रती काही सामाजिक जबाबदारी आहे, हे नेहमीच लक्षात ठेवणारे राळेगाव शहरातील एक सामाजिक संघटन म्हणजे मॉर्निंग पार्क ग्रुप. स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण असो वा वृक्षारोपण, हा ग्रुप नेहमीच समाजपरोपकाराच्या कार्यात आघाडीवर असतो.
असाच एक स्तुत्य उपक्रम या ग्रुपच्या सदस्यांनी हाती घेतला श्री प्रभाकर रामगडे सर, श्री बबलूभाई सैय्यद आणि श्री सतिशभाऊ डाखोरे यांच्या वाढदिवसानिमित्त. कोणताही अनावश्यक खर्च न करता, त्यांनी जिल्हा परिषद मुलींची शाळा, नवीन वस्ती, राळेगाव येथील ८० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचा संकल्प केला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी त्या संकल्पाची पूर्तता केली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, कार्यक्रमाला प्रा. अशोक पिंपरे सर, नगरसेवक कुंदनभाऊ कांबळे, तसेच मॉर्निंग पार्क ग्रुपचे अनेक सदस्य – श्री जानरावभाऊ गिरी, प्रदीपभाऊ ठुणे, संजय पोपट, सचिन चौहान, अनिल डंभारे, विनोद नरड, प्रेम ताकसांडे, सुनील भामकर, भारतभाऊ ठुणे, निलेश पोपट, प्रशांत तोतला, गणेश राऊत, प्रफुल्ल कोल्हे, विवेक गवळी, रफिकभाई शेख, कपिल नहाते, समीर लाखानी, किशोर जुनूनकर – यांची उपस्थिती लाभली तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग या प्रसंगी उपस्थित होते.