
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील ग्राम खैरी येथील नागोबाच्या मंदिरातील लाकडी देवपाटावर ठेवलेल्या चांदी, तांबे व पितळाच्या एकूण २७-२८ छोट्या मूर्ती अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी श्री. हरिहर विठ्ठलराव हरबडे (वय ६०, रा. खैरी) यांच्या फिर्यादीवरून ११ ऑगस्ट २०२५ रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांकडून माहिती घेतली. मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयित दिसून आले. त्यांची ओळख पटवून शोध घेण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींमध्ये
१) संजय अजाबराव कोकाटे (वय ५५, रा. माता मंदिर वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) २) दीपक भीमराव शेंडे (वय ३७, रा. नवीन वस्ती, राळेगाव) विचारपूस केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली व १००% मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला. ही कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, सहा. पोलीस अधीक्षक श्री. रॉबिन बन्सल (उपविभाग पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनाखाली, वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय सुखदेव भोरकडे, एचसी अमोल चौधरी, निलेश वाढाई, दीपक वाड्रसवार, एनपीसी सचिन नेवारे, पीसी विनोद मोतेराव, पीसी आकाश कुदुसे व पीसी अमीर किनाके यांनी केली.
