
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन वडकी येथे ड्रग्ज मुक्त अभियान अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराकरिता श्री. वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील रक्तपेढी विभागातील पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली.
शिबिरात पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळाचे सदस्य, ग्रामवासी, पोलीस अधिकारी, महिला व पुरुष अंमलदार, होमगार्ड सैनिक तसेच पोलीस पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण 103 जणांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.
हा उपक्रम मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस अधीक्षक श्री. रॉबिन बंसल (उपविभाग पांढरकवडा) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी पोलीस स्टेशन वडकीतील अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड सैनिकांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व आणि ड्रग्ज मुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
