
सहसंपादक : रामभाऊ भोयर
उमरी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील पुरातन आई लक्ष्मी माता मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या स्मरणार्थ ग्रामवासीयांच्या वतीने आई लक्ष्मी माता प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी १० वाजता होमपूजा पार पडली तर दुपारी १२ वाजता टाळ-मृदुंगाच्या गजरात, जय माता दीच्या घोषणांनी दुमदुमत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
होमपूजेमध्ये यजमान म्हणून सौ. कोमल जगदीश तुरणकर यांनी कार्यभार सांभाळला. तसेच सौ. गायत्री हनुमंत झुंझूरकर, सौ. चंचल मुकेश बोभाटे, सौ. ममता अतुल रोकडे, सौ. माधुरी नरेश निखाडे आणि सौ. मंगला शंकर धनरे यांनी पूजा-अर्चनेत सहभाग घेतला.
यानंतर नवरात्रीची आरती करून नवरात्रोत्सवाला विधिवत प्रारंभ करण्यात आला.
