
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील येवती येथिल उत्कृष्ट शेतकरी उमेश पोहदरे यांनी एस.आर.टी पद्धतीने शेती करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे एक जीवंत उदारण दिलें आहे. मागील चार वर्षांपासून एस आर टी पद्धतीने शेती करुन चना पिकात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत तसेच मागील वर्षी त्यांचा कापूस CAI कॉटन असोसियेशन ऑफ इंडिया मध्ये तपासणी करण्याकरिता गेला होता सदर यावर्षी पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकरयांना जास्त पावसामुळे सोयाबीन पिकावर येलोमोजाक मुळकूज या रोगाने शेतकऱ्यांचे पिक उध्वस्त झाले व शेतकरी हवालदील झाले परंतु मी एस आर टी पद्धतीने पिकांची लागवड करत असल्याने मला उत्तम पिक आलेले आहे. असे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे सदर एस आर टी पद्धत शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे सदर शेती मध्ये ट्रॅक्टर बैल निंदन यावर होणारा खर्च सुद्धा बंद होतो तसेच रासायनिक खत औषदे यांचा उपयोग कमी प्रमाणात होतो विशेष यात जमिनीचा शेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढून जमीन सुपीक होते व जमिनीतील सुपीक माती शेताच्या बाहेर वाहून जात नाही एस आर टी मध्ये खर्च कमी होतो व शेतात गांडूळाची संख्या खूप वाढते नांगरण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते व समोर चालून एस आर टी शेतकरी हा कार्बन क्रेडिट साठी पात्र होऊ शकतो हे तंत्र देशात तसेच विदेशात खूप झापाट्याने वाढत आहे आपल्या जिल्ह्यात बरेच शेतकरी एस आर टी पद्धतीने शेती करीत आहे. यामध्ये श्रीकांत मानकर वडकी, अमोल वानखेडे सावित्री, पुंडलिकराव वैद्य राळेगाव, प्रमोदरावं माकोडे बाभुळगाव, प्रमोदरावं नंदूरकर मोहदा, अविनाश कुडमेथे झरी झामणी ,अभिषेक वाटीले घाटंजी. तर आज पारंपरिक शेती मध्ये खर्च सुद्धा निघणे कठीण आहे सदर एस आर टी पद्धतीने खर्च कमी करून नफा कमवत आहे. आज शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला आहे.परतु येथे बुडत्याला एस आर टी चा आधार मिळत असल्याचा दावा येवती येथिल उत्कृष्ट शेतकरी उमेश पोहदरे यांनी केला आहे
