
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर समाज आरक्षण मागत असल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये यासाठी तहसीलदार मार्फत थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले.यावेळी आदिवासी बांधवांनी सांगितले की आदिवासी समाजाच्या पारंपारिक हक्क संस्कृती व आरक्षणासंबंधी कोणताही अन्याय होऊ नये यासाठी कोणत्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये संविधानामध्ये आधीच आदिवासींचे मूलभूत हक्क शिक्षण आर्थिक व सामाजिक याबद्दल नमूद केले आहे.इतर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिल्यास खऱ्या व मूळ आदिवासीवर अन्याय होत असल्यामुळे त्यांचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकास थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या तरतुदी प्रभावीपणे राबविण्यात असे निवेदन तहसीलदार श्री अमित भोईटे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावेळी टारझन उईके,रुपेश कुमरे, नागेश्वर तूमरे,आशिष मडकाम,अर्जुन उईके,राजेंद्र आडे, विजय कन्नाके,मिनेश किनाके,विजय नारनवरे, राजेंद्र नैताम राजवर्धन कुमरे,सौरभ आडे, विवेक कुमरे,चिंतामण घोडाम, विजय कोडापे, व मोठ्या संख्येने राळेगाव तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते
