
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीपाऊसाने, अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पिकांचे व चारकोल राॅट व येलो मोझक रोगाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अती पाऊसाने तूर पिक सुकत आहे तर कपाशीचे पिक पिवळे पडले असून वाढ थांबलेली आहे. त्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे.
तर दुसरीकडे केंद्र सरकारने कापूस, तूर, कडधान्या वरील आयात शुल्क पुर्णतः संपवून विदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करून बाजारातील सोयाबीन, तूर, चना, कापूस, मूग या पिकांचे भाव पाडले आहे. वायदे बाजारात शेतीतील सर्व पिकांचे व्यापारावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांवर सुलतानी आणी आस्मानी असे दुहेरी संकट आणले आहे.
सिसिआय ला कापूस विक्रीसाठी किसान ऍप वर नोंदणी करणे, त्यासाठी ई पिक नोंदणी चा ७/१२ आवश्यक केला असून नोंदणीची अंतीम मुदत ३० सप्टेंबर केली आहे. नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून ऍपवर नोंदणी करणे त्रासदायक झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या नोंदणी पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या व इतर समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
मागण्या – १) शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून एन.डी.आर.एफ. चे निकष बाजूला सारून अतीपाऊसाने व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ५० हजार रुपये हेक्टरी मदत तात्काळ जाहीर करावी.
२) *सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार *संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुकती करून ७/१२ कोरा करावा*.
३) *सिसिआय ला कापूस विक्रीसाठी नोंदणी ची बाजार समित्यांमध्ये, खरेदी सेंटर वर कापूस खरेदी सुरू असे पर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवावी*.
४) *शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी *राष्ट्रीयकृत बॅकांनी लादलेली *सिबील स्कोअरची अट तात्काळ रद्द करावी.
५) केंद्र सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या कापूस आयातीवरील रद्द केलेले ११ टक्के आयात शुल्क तातडीने लागू करावे तसेच आयात होणाऱ्या तूर, वाटाणा, कडधान्य यावर आयात शुल्क तातडीने लागू करावे.
६) वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, किंवा तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
७) सरकारने साप हा वन्यप्राणी घोषित केल्यामुळे सर्पदंशाने मृत्यूमुखी पडणा-या व्यक्तीला इतर वन्यप्राण्यांप्रमाणे आर्थिक मदत जाहीर करावी
८)* स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करू नये*
शासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय जाहीर केला नाही, तर दि. १०, ११, १२ डिसेंबर २०२५ ला माता सीते च्या वास्तव्याने पावन भुमी रावेरी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे होणा-या शेतकरी संघटनेच्या महिला अधिवेशनात पुढील निर्णायक आंदोलनाची घोषणा करण्यात येईल. हा इशारा देण्यात येवून
या व इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटने राज्यभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. राळेगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय समोर १२ ते ०३ या वेळात धरणे आंदोलन होत आहे तरी शेतकऱ्यांनी धरणेआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान, राजेंद्र झोटिंग, बाळासाहेब देशमुख, डॉ. शामसुंदर गलाट,अक्षय महाजन, गिरीश तुरके, गोपाल भोयर, सुरेशराव आगलावे, विक्रम फटिंग, नानाजी येनोरकर, किशोरराव झोटिंग, इंदरचद बैद, हेमंत ठाकरे,गजानन ठाकरे, बंडूजी येरगुडे किसनराव पावडे, कीसनराव गाढवे
*शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष्याच्या वतीने करण्यात.आले
