बापू फाउंडेशन राळेगावच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन नगरपंचायत कार्यालयाच्या पुढे होईल शाळा महाविद्यालयीन वर्ग ९ते १२ विद्यार्थ्यांकरिता :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे भारताच्या जडणघडणीत योगदान: या विषयावर १००० शब्दाचा निबंध घरून विद्यार्थ्यांनी लिहून आणून सादर करावयाचा आहे तर चित्रकला स्पर्धेकरिता महात्मा गांधी यांची दांडी यात्रा हा विषय देण्यात आला आहे वर्ग ५ ते ८चे तालुक्यातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात चित्रकला स्पर्धेकरता ड्रॉइंग सीटवर १२ बाय १८ इंच कागदावर दांडीयात्राचे चित्र रेखाटून शाळेतील शिक्षकाकडे १ ऑक्टोबर पर्यंतजमा करावेत स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ११ ऑक्टोबर रोज शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता नगरपंचायत कार्यालय राळेगाव च्या प्रांगणात होईल या स्पर्धेकरिता आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केल्या जाईल या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे बापू फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश माकोडे व प्रकल्प प्रमुख नंदू टिप्पनवार यांनी सांगितले
बापू फाउंडेशन च्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धा
- Post author:lkhtpt
- Post published:September 25, 2025
- Post category:Uncategorized
