
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 19/11/2025 रोजी नवोन्मेष मुख्याध्यापक कार्यशाळेचे उद्घाटन मा.श्री रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.
प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री प्रदीप गोडे,उपशिक्षणाधिकारी,मा. श्रीमती वंदना नाईक, उपशिक्षणाधिकारी,मा.श्री योगेश डाफ, उपशिक्षणाधिकारी,मा.श्री अनिल शेंडगे, विस्तार अधिकारी,मा.श्रीमती स्मिता घावडे , विस्तार अधिकारी उपस्थित होते..
या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील 48 मुख्याध्यापक हजर होते,कार्यशाळेचा प्रमुख उद्देश शैक्षणिक गुणवत्ता वाढ व नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय स्तरावर मूल्यमापन प्रक्रिया विकास कार्यक्रम हे होते.
आपल्या उद्घाटनपर विचार प्रकट करत असताना मा . शिक्षणाधिकारी साहेब यांनी आपली चर्तूसुत्री नियोजन,अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, कार्यात्मक क्षेत्र व मूल्यमापन प्रक्रिया याचे शालेय स्तरावर कसे कौशल्य विकसित करावे हे मुख्याध्यापक यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून समजावून सांगितले.. अनेक ठिकाणी महाभारत, ज्ञानेश्वर यातील श्लोक कथन करुन मुख्याध्यापक यांनी आजच्या काळात कसे अपडेट असले पाहिजे यावर भाष्य केले.
मा .गोडे साहेब यांनी शालेय व्यवस्थापन व मुख्याध्यापक या चर्चासत्रात सहभागी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले, त्यांनी आपले अनुभव कथन करताना मुख्याध्यापक यांच्यासमोर येणाऱ्या अनंत अडचणी व उपाय यावर मार्गदर्शन केले.
श्रीमती वंदना नाईक, उपशिक्षणाधिकारी यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती या विषयावर मार्गदर्शन केले, आहार शिजविताना घ्यावयाची काळजी, मदतनीस यांची कामे, प्राधान्याने समजावून सांगितली..
मा .डाफ साहेब उपशिक्षणाधिकारी यांनी,मंडळ कामे, कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया व अडचणी आणि विज्ञान विषयक योजना यावर मार्गदर्शन केले..
मा .अनिल शेंडगे विस्तार अधिकारी यांनी विविध शिष्यवृत्ती व मुख्याध्यापक यांनी याबाबत करावयाची कामे यावर मार्गदर्शन केले. श्रीमती स्मिता घावडे विस्तार अधिकारी यांनी शालेय अभिलेखे जतन यावर मार्गदर्शन केले,शालेय स्तरावर रेकार्ड कसे ठेवावे, जीआर बाबत घ्यावयाची काळजी,समिती गठन व इतिवृत्त कश्याप्रकारे लिहिले गेले पाहिजे यावर भाष्य केले, बर्याच गोष्टी या कार्यशाळेत शिकायला मिळाल्या अश्या प्रतिक्रिया मुख्याध्यापक व्यक्त करत होते, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक देशमुख सर यांनी केले..
