अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे “बाबा ते बाबा अभियान”

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

चंद्रपुर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 38 व्या वर्धापन दिनानिमित्त “बाबा ते बाबा” हे अभियान दिनांक 6 डिसेंबर 2020 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम राबवून साजरे करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून ते संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिना पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 38 वर्षाची वाटचाल जनतेसमोर मांडणे, समाज सुधारक व संत-महात्मे यांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक विचार जनतेला समजावून सांगणे, कोरोना महामारी च्या काळात स्वतःची काळजी स्वतः घेऊन निरोगी जीवन जगण्यासाठी विवेकवादी विचारांची आवश्यकता असल्याचे समजावून सांगणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
राज्यस्तरीय सदर अभियानाचे उद्घाटन दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी वर्च्युअल पद्धतीने होणार आहे आणि त्याचा समारोप 22 डिसेंबर 2020 ला प्रा. श्याम मानव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संपूर्ण कार्यक्रम जनतेसाठी फेसबुक’वर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पेजवर लाईव उपलब्ध असतील, तरी जनतेने या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा. असे आवाहन अं.नि.स. चे राज्य संघटक श्री हरि पाथोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.