चिमूर: कवडशी (देश)येथील दहा वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू

चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथून जवळ असलेल्या कवडशी ( देश)येथील दहा वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १३डिसेंबर रविवारला दुपारी २ वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे .

य सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कवडशी (देश )येतील करण नरेंद्र बगडे व त्याचे दोन मित्र हे गावाजवळ असलेल्या गाव तलावात सिंगाडे तोडण्यासाठी गेले होते नरेंद्र बगडेे तलावातून शिंगाडे तोडत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडू लागला तसेच त्याचे दोन मित्र तिथून पळून गेले परंतु बाजूनीच एक महिला कपडे धूत असताना तिच्या लक्षात आले तिने गावात धाव घेवुन लोकाना बोलविले व त्या बालकाला बाहेर काढले त्याला शँकरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता तिथून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये नेत असताना वाटेतच त्या बालकाचा मृत्यू झाला करन बडगे हा १० वर्षाचा होता तो जिल्हा परिषद शाळा कवडशी येथे चौथ्या वर्गात शिकत होता त्याच्या मागे एक लहान बहिण असून आई – वडिलावर खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे भिसी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आलेला आहे.

प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर