

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
लोकहीत महाराष्ट्र चंद्रपूर ग्रुप ला जॉईन करण्यासाठी खाली क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/G89E43ibblxErzEKGguOcb
चंद्रपुरातील 2 वर्षे 10 महिन्यांची चिमुकली नियारा जैन हिच्या बुद्धिमत्तेची दखल ब्रावो बुक ऑफ इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेत तिला ग्लोबल किड्स हा पुरस्कार देण्यात आला आहे.
3 नोव्हेंबर रोजी या संस्थेने ऑनलाईन स्पर्धा घेतली होती, त्यात नियारा सहभागी झाली होती. ज्या वयात एबीसीडी पाठ होत नाही त्या वयात नियारा तब्बल दीडशे देशाच्या राजधानींच्या शहरांची नावे पटपट सांगते. तिचं ज्ञान एवढ्यावरच सीमित नसून तिला 145 देशांचे राष्ट्रध्वज सुद्धा ओळखता येतात. सोबतच नियाराला 15 नृत्य प्रकारातील मुद्रा अवगत आहेत. त्यात पालकांचा मोठा वाटा आहे.
तिला टीव्ही, कंप्यूटर आणि मोबाइल फोन पासून दूर ठेवत छापील साहित्य देण्यात आले. त्याची आवड निर्माण केली. त्यामुळे हे शक्य झालं असं तिची आई सांगते.
