पांढरकवडा येथे रांगोळी स्पर्धेने सर्वांना केले आकर्षित

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

पांढरकवडा येथे नगरपरिषद द्वारा आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा ही आज आकर्षणाच्या मध्यभागी होती, पांढरकवडा शहरात सर्व मुख्य चौकात ही स्पर्धा राबविली गेली व पांढरकवडा शहरातील सर्व शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यामध्ये उत्स4 प्रतिसाद नोंदविला.
पांढरकवडा शहरात तहसील चौक, बसवेश्वर चौक, अग्रेसन चौक तसेच झरी रोड याठिकाणी ही स्पर्धा राबविली होती, यामध्ये जिल्हा परिषद शाळा, गुरुकुल शाळा, के इ स शाळा, विकास हिंदी विद्यालय, शिवरामजी मोघे महाविद्यालय व बाबासाहेब पारवेकर महाविद्यालय आदींनी सहभाग नोंदविला..