युवक काँग्रेसचे चे मा. मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी जाहीर केलेली मदत सरसकट शेतकऱ्यांना देण्याबाबत व पंतप्रधान पिक विमा मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सप्टेंबर-आक्टोंबर मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक नष्ट झाले.पण आपण जाहीर केलेल्या हेक्टरी १०,००० रूपये आर्थिक मदतीचा लाभ फक्त निवडक शेतकऱ्यांना मिळाला.त्यामुळे आपण सोयाबीन पिकासाठी जाहीर केलेली आर्थिक मदत जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावी.
त्याचपाठोपाठ अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीच्या समस्येला सामोरे जावे लागले.बोंडअळीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ६० टक्क्यांची घट आलेली आहे.या विविध समस्येमुळे शेतकरी पूर्णपणे बेजार झाला असून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याकरिता पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा. उपस्थित विपीन चिंतावार,समीर चंदरणे,राज मिसेवार,स्वप्निल गौरवार,रतन येडे,अभिलाष उमरे,सौरभ पुट्टेवार,अवि पाटील चालबर्डीकर,गजानन कासडवार आदी उपस्थित होते.