
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर
दिनांक 02/06/2021 ला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद कक्ष , पांढरकवडा यांच्या अंतर्गत तालुक्यातील झाशीची राणी प्रभाग संघ पहापळ येथील विकास गंगा ग्राम संघ पहापळ या गावी महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियाना अंतर्गत घरकूल मार्ट चे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमामध्ये पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री चव्हाण सर, श्री कुलसंगे सर,श्री विनकरे सर, गावाच्या सरपंचा सौ. सुषमा ताई कुडमते, ग्रा. पं सदस्य श्री प्रशांत भाऊ करपते,पंचायत समिती सदस्या सौ. वेट्टी ताई , झाशीची राणी प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ सिमा ताई जळके, विकास गंगा पहपल ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ शोभा ताई करपते, सचिव सौ वर्षा उईके, कोषाध्यक्ष शमा दीदी,गावातील कॅडर व तालुका अभियान कक्षातील BMM श्री कांबळे सर, श्री पराग सर, श्री आत्राम सर, श्री हेले सर, श्री उइके सर, कु. पुष्पा मॅडम, श्री संदलवार सर व उमेद कक्षातील बाकी कर्मचारी उपस्थित होते.
