धक्कादायक :मुलगी झाली म्हणून महिलेला जिवंत जाळले

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहल्या जाते.त्यामुळे कित्येक स्त्री अभ्रक पोटातच मारले जाते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातअत्यंत दुःखद घटना घडली आहे.वंश पुढे न्यावा या हव्यासापोटी मुलगा जन्माला यावा अशी कित्येकांची इच्छा असते.केळापुर तालुक्यातील दातपाडी या गावातील मोनिका गणेश पवार ह्या महिलेला तिच्या नणंदने तेल टाकून जाळल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत मोनिका गणेश पवार हिने
4 जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला, मुलीला जन्म दिल्या कारणावरून नणंद कांता संजय राठोड हिने घरात वाद घातला. पण मोनिका ने याकडे दुर्लक्ष केले व बाथरूम ला गेली असता तिच्यावर तेल ओतून तिला जाळले दरम्यान ती 80% जळालेल्या अवस्थेत सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र 17 जुलै रोजी तिने अखेरचा श्वास घेतला,
सदर घटनेचा पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत भा.दं.स. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.