पांढरकवड्यात वाघाची दहशत कायम,वारा कवठा येथील इसमाला केले घायल

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ पांढरकवडा तालुक्यातील वारा कवठा या परिसरातिल ऐका शेतामध्ये मंदिर बांधकाम करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित दर्शनासाठी गावातील काही नागरिक शेतामध्ये मंदिर निर्मिती कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता गेली असता वारा कवठा येथील वैभव गंगाधर भोयर व त्याचे दोन मित्र या कार्यक्रमात उपस्थिती दर्शनासाठी आपल्या मित्रासोबत सकाळी ११ वाजता शेताकडे निघाल्या असता वैभव याच्यावर वाघाने मागून हल्ला केला व त्याच्या पाय पकडले असता त्याचे मित्रानी आरडा,ओरड करून कार्यक्रमाला उपस्थित लोकांना बोलावले व आरडाओरड करून नागरिकांनी वाघाला पळून लावले या घटनेत वैभव गंगाधर भोयर वय पंचवीस वर्ष जखमी झाला असता त्याला प्रथम उपचार पाटणबोरी येथे करण्यात आले व त्यानंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे . या घटनेची माहिती मिळताच वनविभाग पांढरकवडा व पोलीस पांढरकवडा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळावर जाऊन चौकशी केली वन विभाग पांढरकवडा येथील वनमजूर त्या ठिकाण संचार व गस्तीसाठी तिथे प्राचारन करण्यात आले असून त्या ठिकाणी टास कॅमेरे लावण्यात आले असल्याचे वन विभागामार्फत माहिती सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे वारा कवठा येथील नागरिकात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेच्या अगदोर अनेक घटना या परिसरात घडत असतात मागील वर्षीत याच गावातील एका इसमावर वाघाने हल्लात त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे गावातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.