बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात रक्तदान शिबीर

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

राज्यात कमी होत चाललेला रक्त साठा याकरिता महाराष्ट्र शासनाने रक्तदान करण्यासाठी पुढे या असे आवाहन केले होते, यालाच प्रतिसाद म्हणून पांढरकवडा येथील श्री. बाबासाहेब पारवेकर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते..
महाविद्यालयाचे आजी – माजी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग तथा  पांढरकवडा शहरातील अनेक सुजाण नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व रक्तदान केले.