
,
नगर परिषदेचे मुख्याधिकारी मोट्टेमवार यांची रस्त्यावर येऊन कारवाई
प्रतिनिधी :सुमित चाटाळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. बाहेर फिरणाऱ्या अशा नागरीकांची पांढरकवडा कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. सोमवारी पांढरकवडा शहरात सकाळपासून अनेक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या अनेक व्यक्तींना पकडून त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांची रवानगी गृह विलगीकरणात करण्यात येत आहे.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्टकोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास गृह विलगीकरणात रवानगी .वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चाप लावण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासन, नगर परिषद पांढरकवडा प्रशासन आणि पोलिसांकडून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. तसेच अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान जे नागरिक कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडत आहेत त्यांची रवानगी कोव्हीड सेंटर ला केली जाणार आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार हे स्वतः रस्त्यावर उतरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहे..
