
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
दि . २६ जानेवारी २०२०१
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या शहिदांनी आपल्या प्राणाचे मोल दिले , ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हालअपेष्टा सहन केल्या त्यांच्या बलिदानाचे फलित म्हणजे राष्ट्रध्वज. जाती , धर्म , पंथापेक्षाही श्रेष्ठ असा हा राष्ट्रध्वज . परंतु या देशाचे आणि आमचेही दुर्भाग्य कि याच राष्ट्रध्वजाचा अपमान हा दर १५ ऑ. व २६ जानेवारीला ला होत असतो . कागदी व प्लास्टिक चे राष्ट्रध्वज नकळत लहान मुलांच्या व नागरिकांच्या हातुन रस्त्यावर पडून राहतात . ज्या राष्ट्रध्वजासाठी कित्येकांनी आपल्या आयुष्याची होळी केली , तेच राष्ट्रध्वज असे पडलेले पाहून मन खिन्न होते . राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबवण्या मागचा मूळ उद्देश हाच कि या देशातल्या सामान्य माणसाला याचं महत्व कळावं ..🇮🇳
ज्या तिरंग्यासाठी भगतसिंग , सुखदेव , राजगुरु तारुण्यात हसत हसत फासावर गेले तोच तिरंगा आज रस्त्यावर नाल्यात व ईतरत्र पडून दिसतो . यापेक्षा दुसरी मोठी शोकांतिका काय असू शकते ?
शहिदांच्या प्राणाचे मोल देऊन आम्ही हा ” राष्ट्रध्वज” फडकवला आहे राष्ट्रध्वजाच्या रक्षणासाठी देशातील तरुणांनी सीमेवर आपले रक्त अर्पण केले . कित्येक सौभाग्यवतींनी आपल्या कपाळाचे कुंकू हसत हसत या ध्वजासाठी अर्पण केले . मातांनी आपले तरुण पुत्र या ध्वजाच्या तळपत्या तेजाला सहर्ष अर्पण केले . ” राष्ट्रध्वज ” हा कोणत्याही राष्ट्राचा प्राण असतो . तो प्राणपणानेच जपला पाहिजे . त्या साठी मागील काही वर्षांपासुन आमचा हा छोटासा प्रयास सुरु आहे.🇮🇳
प्लास्टिकचा तिरंगा आपण लहान मुलास घेऊन देतो। त्या मागे आपली भावना चांगलीच असते। मुलाच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावे हा आपला उद्देश असतो। पण नकळत लहान मुलांचे खेळणे झाले की तो प्लास्टिकचा ध्वज मुलाच्या हातून कुठे तरी खाली पडतो, कुणाच्या तरी पायदळी जातो। लहान मुलं पाहतात व त्यांच्या मनात अशी भावना निर्माण होते की ही वस्तू खेळून झाल्या नंतर फेकून द्यायचीच असते। नकळत आपण एक घोर पाप करीत असतो, ते म्हणजे तिरंगा पायदळी तुडविण्याचे! तेव्हा असं होऊ नये म्हणून आम्ही राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबवतो। आपल्या या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन नागरीक स्वतः जागरुक झाले आहे व राष्ट्रध्वजाचा न कळत होणारा अपमान कमी झाला आहे . नागरिक स्वतः काळजी घ्यायला लागले आहेत .
आमच्या वतीने या वर्षी सुद्धा येत्या २० जानेवारी २०२१ ला राष्ट्रध्वज सन्मान अभियान संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येनार आहे . यात राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची जागृती करण्यात येणार आहे राष्ट्रध्वजाचा अपमाण होऊ देऊ नका. आपणास रस्त्यावर इतरत्र राष्ट्रध्वज अदाकदाचित पडुन दिसलेच तर तर ते सन्मानाने उचलून ” आमच्याशी संपर्क करुन गोळा करावे.
केळापुर तालुक्यातील सर्व नागरिकांनी , शिक्षकांनी , विद्यार्थ्यांनी व युवक – युवतींनी , खेळाडूंनी व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी या अभियानात सहभागी होण्याचे आव्हान आम्ही करीत आहोत .
या उपक्रमात अजुनही काही संघटना सहभागी होनार आहे 🇮🇳
आपनही सहभागी व्हा
सुमित चाटाळे, तालुकाध्यक्ष
विर भगतसींग विद्यार्थी परीषद, तालुका केळापूर
