

करंजी येथे पीक विमा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार. प्रा. अशोक उईके यांनी यावेळी नागरिकांच्या पीक विम्यासंदर्भात समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.
शहीद बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बिरसा मुंडा समाज भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी माजी आदिवासी मंत्री तथा राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार प्रा. अशोक उईके, पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम, तहसीलदार कव्हाळे साहेब, गट विकास अधिकारी चव्हाण साहेब, शिवसेना तालुकाप्रमुख तिरुपती कंदकुरीवार, करंजी ग्रामपंचायत सरपंच सौ. रामपुरेताई, उपसरपंच श्री. प्रफुल भाऊ नगराळे, श्री. विनोद भाऊ बोरतवार, श्री. महादेव ठाकरे आदी उपस्थित होते..
